सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! सांगवीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ : आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

(बारामती ) सांगवी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. असे असले तरी लसीच्या तुटवड्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. तर परिस्थिती हाताळताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना सांगवीतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट दम भरला. यामुळे काम करायचे कसे असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तर सांगवी आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील इतर गावांतील नागरिकांना पहाटे पासून रांगेत थांबून देखील लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी आणि नागरिकांत मोठ्या प्रमाणात वाद  झालेला पाहायला मिळाला. यामुळे आता इतर गावातील लस न मिळालेले नागरिक थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
         बारामतीचे आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यातच ताळमेळ नसल्याने केंद्रावर रोज मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. यामुळे सांगवी आरोग्य केंद्रात नियोजन शून्य असून सांगवी ग्रामपंचायतसह पदाधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे. गर्दी व गोंधळामुळे पुढील अनर्थ टळण्यासाठी पोलिसांना पाचारण करून पोलिसांच्या बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुणांची  लसीकरण कर्मचाऱ्यांना दमदाटी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. तर मध्येच येऊन रजिस्ट्रेशन करत असल्याने अवघ्या काही मिनिटात कुपन संपल्याचे सांगितल्याने रांगेतील नागरिकांनी एकच गदारोळ करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
        त्यातच हे प्रकरण हातघाईवर गेल्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाले.  कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यासाठी रुग्णालयात अनेक दिवसांपासून रांगा सुरू आहेत. मात्र, सांगवीच्या पदाधिकाऱ्यांनी लशी बाहेर जाऊ न दिल्याचा ठपका मेखळी गावातील पदाधिकाऱ्यांनी  ठेवला. 
           अनेक पुरुष व महिला रांगेत उभे राहूनही ज्यांना टोकन मिळाले नाही, ते लोक आक्रमक झाले. यामुळे एकच गदारोळ उडाला. नेमके याचवेळी अनेक नागरिकांना दोन टोकन देण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली. कूपन लवकर कशी संपली, अशी विचारणा काहींनी केल्याने गोंधळ उडाला. यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला. रांगेतील काही नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांत वादावादी सुरू झाली. यामुळे आता सांगवी येथील आरोग्य केंद्रात होत असणाऱ्यालसीकरणाच्या गोंधळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेणार हे पहाणे महत्वाचे आहे.

मदत कार्याच्या नावाखाली ओळखीच्या लोकांचे रजिस्ट्रेशन 
आरोग्य केंद्रात काही तरुण व पदाधिकारी मदत कार्याच्या नावाखाली घुसखोरी करून आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून ओळखीच्या चार ते पाच व्यक्तींचे एकाच वेळी रजिस्ट्रेशन करून कुपन घेऊन लस दिली जात आहे. याकडे मात्र पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे पहाटे पासून रांगेत थांबणाऱ्या वयोवृद्धसह ४५ वर्षांच्या पुढील व्यक्तींवर अन्याय होत आहे.  लगेच कुपन संपल्याचे जाहिर केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र, लसीकरणापासून वंचित राहू लागले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढू लागली आहे. 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7047,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! सांगवीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ : आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या
बारामती ! सांगवीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ : आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या
https://lh3.googleusercontent.com/-ATzXoOb8sAM/YPwl4v3Ag0I/AAAAAAAAK5E/0EhBxxpxiGwfKcLiMmDXDHzoUvKRGNWYgCLcBGAsYHQ/s1600/1627137484056181-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ATzXoOb8sAM/YPwl4v3Ag0I/AAAAAAAAK5E/0EhBxxpxiGwfKcLiMmDXDHzoUvKRGNWYgCLcBGAsYHQ/s72-c/1627137484056181-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/07/blog-post_0.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/07/blog-post_0.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy