सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद शहरात सध्या पथदिवे बंद असल्याचा फायदा
घेऊन चोरट्यांनी सहा ते सात घरफोड्या आणि तीन ते
चार दुकान फोडल्याने शहरात घबराटीचे वातावरण
पसरले आहे. या घटनेत सोने-चांदी व रोख रकमेसह
लाखो रुपयांची लूट केली असल्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे.
लोणंद पोलिसांकडून सातारा येथील श्वानपथकास तातडीने पाचारण करण्यात आले असून वीर या श्वानाच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
शहरातील चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. सध्या
पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस गुडूप अंधार
पसरलेला असतो. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही
बसवलेले असूनदेखील अंधारामुळे ते कुचकामी ठरले
आहेत. लोणंद मध्ये अजून कोणाच्या घरी चोरी झाली
असेल तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
COMMENTS