शिरवळ बस स्थानकातील खुनाचा बारा तासात छडा : खून करून पळून जण्याच्या तयारीतील एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

काल शिरवळ बस स्थानकाच्या शौचालयात घडलेल्या खून प्रकरणाचा छडा अवघ्या बारा तासात लावून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. 

काल दिनांक २० रोजी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत शिरवळ एस.टी.स्टॉन्डचे सार्वजनीक शौचालय येथे
एका इसमाचा खुन झाला होता. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा व धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी  किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आनंदसिंग साबळे, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे अधिपत्याखाली एक पोलीस पथक तयार करुन
खुनाचा सखोल तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा हे
स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकासह शिरवळ परिसरत रवाना झाले असता किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिरवळ येथील खुन करणारा इसम शिरवळ एस.टी.स्टॉन्डचे पाठिमागे फिरत असून तो सातारा जिल्हयातून पलायण करण्याच्या बेतात आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी तात्काळ आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना फोन द्वारे संपर्क साधून माहिती दिली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक माहिती मिळाताच शिरवळ एस.टी.स्टॉन्ड परिसरात सापळा रचून थांबले होते. थोडयाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे असलेला संशयीत इसम शिरवळ एस.टी. स्टॅन्डचे दिशेने येताना दिसला स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ सदर संशयीत इसमास ताब्यात घेणेसाठी हालचाल केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने मोठया शिताफिने त्यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे खुनाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याचे नाव विनोद भिमराव वावळे वय २८ रा शिरवळ असून त्याने पोलीस पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकाने त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता संशयीत इसमाने दारुच्या नशेत किरकोळ वादाच्या कारणावरून राग आल्याने त्याचा खुन केला असले बाबत कबूली दिली. 

सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाने व शिरवळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या तपास करून १२ तासाचे आत उघड केला असून आरोपीस पुढील कारवाई करीता शिरवळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.


सदर कारवाईमध्ये अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा व धिरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या सुचनां प्रमाणे तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधीकारी फलटण विभाग, तसेच श्रीमती शितल जानवे खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, व महेश इंगळे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे यांनी आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा,  सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे सफौ उत्तम दबडे, तानाजी माने, पोहवा संतोष सपकाळ, मोहन नाचण, पोना राजकूमार ननावरे, अजित कणे, निलेश काटकर, नितिन गोगावले पोशि वैभव सावंत, पोशि चालक विजय सावंत स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सफौ हजारे, वळवी, पोहवा आप्पा कोलवडकर, पोना जितू शिंदे , धिरज यादव, वैभव सुर्यवंशी, पोशि सचिन शेलार, संतोष ननावरे, भाऊसाहेब दिघे, नितीन महांगरे, सचिन वीर, प्रशांत वाघमारे, विनोद पवार शिरवळ पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला असून अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
To Top