ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन : ही शैक्षणिक पात्रता असणारे इच्छुक घेऊ शकतात सहभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाने या वर्षातील 5 वा पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केलेला आहे. 
        या मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवून ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत.
याकरिता एस. एस. सी., एच.एस.सी., पदवीधर व आय. टी. आय. चे विविध ट्रेड, उदा. पेंटर, फिटर, वेल्डर, डिझेल मॅकेनिक, मोटर मॅकेनिक, टर्नर, मशिनिस्ट, शीट मेटल, ट्रॅक्टर मॅकेनिक, वायरमन, एमसीव्हीसी (ऑटो) इ. तसेच सेल्स एक्झीक्युटीव्ह, क्वालिटी चेकर, मशीन ऑपरेटर, हेल्पर इत्यादी प्रकारची पदे उपलब्ध असून, या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी, एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अॅप्लाय करावे, व ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी प्रथम नोंदणी करुन नंतर अॅप्लाय करावे.
याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 020-26133606 वर संपर्क साधावा. तसेच या वेबपोर्टलवर जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते. तरी कृपया उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती पहावी व पसंतीनुसार अॅप्लाय करावे, असे आवाहन सौ. अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे यांनी केले आहे.
To Top