सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यावरून पुणे जिल्हा बँकेपुढे लावलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी जंग जंग पिछाडून अखेर चोरी गेलेला ट्रॅक्टर आज मालकाच्या स्वाधीन केला.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीत हा ट्रॅक्टर मालकाला स्वाधीन केला. यावेळी सपोनि सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार दिपक वारुळे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस नाईक नितीन बोराडे, पोलीस नाईक अमोल भोसले, पोलीस शिपाई महादेव साळुंखे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब नलवडे, किशोर भोसले, लालासाहेब माळशिकारे, ट्रॅक्टर मालक सचिन जगताप तसेच प्रभाकर जगताप, प्रदीप जगताप तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सदरचा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर मालक यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक नितीन बोराडे यांनी केलेला आहे गुन्ह्यात केले तपासाबाबत संचालक मंडळातर्फे एपीआय सोमनाथ लांडे तसेच नितीन बोराडे व योगेश शेलार जे विशेष असे आभार मानण्यात आलेले आहेत सदरचा ट्रॅक्टर हा दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी चोरी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातून झालेला होता.