काकडे महाविद्यालयात पीएचडी प्रवेश परीक्षा तयारीसाठी 'संशोधन पद्धती' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर येथे संशोधन पद्धती समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार, दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा तयारीसाठी संशोधन पद्धती या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रेश्मा पठाण या उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी भूषवले, यानंतर प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून ज्या शिक्षकांनी पीएचडी प्रवेश परीक्षा फॉर्म भरले आहेत अशा शिक्षकांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. रेश्मा पठाण यांनी संशोधन म्हणजे काय हे स्पष्ट करून संशोधनासाठी विषय कसा निवडावा हे व्यवहारातील विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले तसेच संशोधन प्रबंधाची मांडणी याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. चेतना तावरे यांनी करून दिला तसेच बीबीसीए विभागाचे उपप्राचार्य रजनीकांत गायकवाड यांनी आभार मानले.
To Top