सोमेश्वर रिपोर्टर टीम- ------
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत उसाची एफआरपी (रास्त आणि मोबदला देणारी किंमत) सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावाला अखेर मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याचा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के वसुलीच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) २९० रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, एफआरपी प्रति क्विंटल ५रुपयांनी वाढलीय. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये १० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता उसाची एफआरपी २९० रुपये प्रति क्विंटल झाली आहे.