सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा लांबणीवर पडल्या असून या सहकारी संस्थांना ३१ डिसेंबर पर्यंत वार्षिक सभा घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या ३० सप्टेंबर पर्यंत घेणे बंधन कारक असते मात्र गेले दोन वर्षे कोविड च्या प्रादुर्भावामुळे वार्षिक सभा उशिरा घेण्यास मुभा दिली जात आहे.