सोमेश्वर रिपोर्टर टीम------
"भद्रकाली नारीशक्ती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य"
अंतर्गत १५ ऑगस्ट निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या निबंध स्पर्धेत सोमेश्वर विद्यालयाच्या ९ वी मधील सृष्टी रासकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या निबंधाचा विषय "स्त्री पुरुष समानता काळाची गरज" हा होता. तिला प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्रही देण्यात आलेले आहे.
सृष्टी दयानंद रासकर ही सोमेश्वर विद्यालयाची ई ९ वी क मधील विद्यार्थिनी आहे .