सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

अजितदादा... जरा इकडे पण लक्ष द्या ! डोर्लेवाडीच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्रकाराला शिवीगाळ

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
डोर्लेवाडी : प्रतिनिधी

डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण वशिलेबाजीवर होत असल्याचे समजताच बारामती पंचायत समिती तसेच डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सबंधीत वैद्यकिय अधिकाºयाच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामपंचायतीने देखील वारंवार पंचायत समितीमध्ये ग्रामसभेचे ठराव व निवेदने देण्यात आली आहेत. 
       तसेच पुन्हा एकदा या वैद्यकिय  अधिकाºयाच्या मनमानी कारभारा विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे सरपंच पांडुरंग सलवदे यांनी सांगितले. डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र लाभार्थ्यांना लस  मिळविताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी वशिला असणारांनाच लस मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत काही वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांनी सबंधीत पत्रकाराला आरेरावी भाषा वापरत शिविगाळ केली. या प्रकाराची
आॅडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  तसेच पत्रकार संघटांना देखील या प्रकरणानंतर आक्रमक झाल्या आहेत. या वृत्तानंतर डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी या वैद्यकिय अधिकाºयाच्या मनमानी
कारभाराचा पाढाच वाचला. अनेकवेळा याबाबत पंचायत समितीला निवेदन दिले गेले आहे. 
           अगदी ग्रामसभेने या वैद्यकिय अधिकाºयाच्या बदलीबाबत केलेले ठरावांची देखील पंचायत समितीने दख घेतली नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील याबाबत काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. सबंधीत वैद्यकिय अधिकाºयाची शासकिय नियमानुसार तातडीने बदली करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
--------------------------
 ग्रामस्थांच्या तक्रारीची पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात येईल. तसेच सबंधित वैद्यकिय अधिकाºयाला समज देण्यात येईल.
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती बारामती
--------------------------
 प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरणाच्या तक्रारी बाबत वैद्यकीय अधिकाºयांना वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यामध्ये कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही रुग्णांना योग्य वागणूक व उपचार
देने गरजेचे आहे.लसीकरणाच्या तक्रारी बाबत बैैठक घेण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या वैद्यकिय अधिकाºयाच्या बदलीबाबत निवेदन देण्यात आले होते. यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सबंधीत
वैद्यकिय अधिकाºयांची बदली करावी, असे निवेदन देण्यात येणार आहे.
- पांडुरंग नारायण सलवदे
सरपंच ग्रामपंचायत डोर्लेवाडी
------------------------------
प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी यांचे बाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. येथील  वैद्यकीय अधिकारी रुग्णांना व पदाधिकाºयांना योग्य वागणूक देत नाहीत.  शिवाय गोरगरिब रुग्णांना योग्य उपचार दिले जात नाहीत.  कोविड
लसीकरणा बाबत अनेक तक्रारी आहेत. गाव पातळीवर नागरिकांना प्राधान्य न देता बाहेरील गावातील नागरिकांना बेकायदेशीर लस दिली जात आहे. या बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्रामपंचायत मध्ये
ग्रामसभेत अनेकवेळा ठराव होऊन ही बदली होत नाही. एकाच ठिकाणी सलग १०-१२ वर्ष हे वैद्यकिय अधिकारी कसे काम करू शकतात या बाबत प्रशासनाने योग्य
दखल घ्यावी.
- रामभाऊ कालगावकर
ग्रामपंचायत सदस्य डोर्लेवाडी ग्रामपंचायत
----------------------------
पत्रकार संघटना आक्रमक अजित पवार यांना भेटणार
बारामती मध्ये अश्या घटना घटना वारंवार घडत पत्रकार संघटना गप्प बसणार नाहीत. संबंधीत महिला  अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर  बारामती प्रशासकीय भवनासमोर आंदोलनात केले जाईल.
वसंत मोरे - 
अध्यक्ष बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6983,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : अजितदादा... जरा इकडे पण लक्ष द्या ! डोर्लेवाडीच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्रकाराला शिवीगाळ
अजितदादा... जरा इकडे पण लक्ष द्या ! डोर्लेवाडीच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्रकाराला शिवीगाळ
https://lh3.googleusercontent.com/-2CcV32GXlwo/YSYrKigJS_I/AAAAAAAALO4/BNbrBCyOBM8YydA3zj3AZlocC_GVCdmJQCLcBGAsYHQ/s1600/1629891363577656-0.png
https://lh3.googleusercontent.com/-2CcV32GXlwo/YSYrKigJS_I/AAAAAAAALO4/BNbrBCyOBM8YydA3zj3AZlocC_GVCdmJQCLcBGAsYHQ/s72-c/1629891363577656-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/08/blog-post_92.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/08/blog-post_92.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy