सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
युवसंकल्प आयोजित राज्यस्तरीय पोषण बाग निर्मिती स्पर्धेत उत्कर्ष माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी हनुमंतराव सावंत यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांना पारितोषिक म्हणून एक लाख रुपयाची झाडे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत रानभाज्या निर्मिती व औषधी वनस्पती या वर भर देण्यात आला होता.स्पर्धेचे गुणांकन उपलब्ध जागेचा प्रभावी वापर,घरातील ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग,सीड बँकेची उपलब्द्धता आणि शाश्वतता,उच्च पोषण मूल्य असणाऱ्या किती औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याची लागवड या निकषांवर केले होते.
सहभागी स्पर्धकांना बोन्साय करणे, कलम करणे, कोकिडामा तंत्र,कंपोस्ट खत तयार करणे,जीवामृत तयार करणे, रानभाज्यांची ओळख ,पोषण बाग तयार करणे इ गोष्टी ऑनलाईन सेशन द्वारे शिकवण्यात आले. त्यानुसार स्पर्धकांनी पोषण बागेची निर्मिती केेली होती. पोषण बागेचे परीक्षण करून रोहिणी सावंत यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत व सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केलं.