सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारापोटी ४३ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. ज्येष्ठ नागरिकाने शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी याबाबत विजय अनंतराव सावंत (रा. वसंतनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. आहेत. या त्यानुसार अशोक विठ्ठल महानवर (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती), दिलीप विठ्ठल टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी पणदरे, ता. बारामती) व राहुल जगन्नाथ - सुभाष वाकुडे (रा. माळेगाव) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकुडे याने जमिनीची नोंद करून देतो, असे आश्वासन फिर्यादीला दिले. प्रत्यक्षात नोंद करून दिलीच नाही. शिवाजी महानवर यांनी खरेदीखत उलटून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या व्यवहारातही फिर्यादीने ६ लाख रुपये भरले. परंतु या जमिनीवर दोन पतसंस्थांचा बोजा असल्याचे दिसून आले. तसेच अशोक याने खासगी देवस्थान ट्रस्टकडूनही या जमिनीवर पैसे घेतल्याचे दिसून आले. या नोंदी कमी करण्यासाठी फिर्यादीने ७ लाख ७५ हजार रुपये दिले. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. परंतु आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वतःसाठीच वापरल्या.
------------ --- - -------
मार्च २०१९ मध्ये देंगले यांच्या ओळखीने गडदरवाडी येथील अशोक महानवर यांची ७२ गुंठे जमीन खरेदी करण्याचे फिर्यादीने ठरवले. हा व्यवहार १० लाख रुपयांना ठरला. यातील एक लाखाची रक्कम घनादेशाद्वारे महानवर यांचे मेहुणे टेंगले यांच्या नावे देण्यात आली. तर उर्वरित नऊ लाखांची रक्कम धनादेश आणि रोख देण्यात आली.
-----------------------
प्रत्यक्षात महानवर यांनी खरेदीखताने केवळ ३२ गुंठे जमीन दिली. जमिनीची नोंद लावण्यासाठी फिर्यादी तलाठ्याकडे गेले असताना अशोक महानवर यांनी चुलते शिवाजी महानवर यांना पाच वर्षे मुदत खरेदीने ही जमीन यापूर्वीच दिली असल्याचे दिसून आले. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याने कबुली दिली.