पुरंदर l यादववाडी येथे हरगुडेतील तरुणावर तलवारीने वार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परिंचे : प्रतिनिधी 

यादववाडी (ता.पुरंदर) येथील हॉटेल श्रीनाथ समोर हरगुडे येथील तरुणावर तीन जनांच्या टोळक्याने दमदाटी, शिवीगाळ करत तलवारीने वार केल्याची घटना मंगळवारी(दि.२४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास  घडली आहे.
         याबाबत किरण युवराज ताकवले (वय ३५ ) यांनी तीन तरुणांन विरोधात सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे. घटनेचे कारण अद्याप समजले नसून सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने पुढील तपास सुरू आहे.
             या बाबत सविस्तर हकिगत अशी आहे की किरण युवराज ताकवले हे मित्रांसमवेत यादववाडी येथील हॉटेल समोर बसले असताना आरोपी साई महादेव ताकवले,योगेश कृष्णांत ताकवले दोघे सध्या रहाणार भेकराई नगर (हडपसर) व नितीन प्रदिप ताकवले राहाणार हरगुडे
हुंदाई कंपनीची लाल रंगाची चार चाकी गाडी नंबर एम. एच. ०७ क्यू ८२४७ मधून आले शिवीगाळ दमदाटी करून साई महादेव ताकवले याने तलवारीने तीन वार करून डाव्या हाताचे मनगटावर जवळ, उजव्या हाताचे कोपरे जवळ, उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ दुखापत करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
    तसेच माझा मित्र अविनाश सोपान जाधव यासुद्धा ट्रक मधून खाली ओढून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर घटना ही पुर्व वैमनस्यातून घडली असल्याचे सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत माळी पुढील तपास करीत असून आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याचे आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
To Top