बारामती तालुका पत्रकार संघटना आक्रमक : 'त्या' महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------

डोर्लेवाडी ( ता. बारामती ) येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येथिल संबंधित पत्रकारने एका बातमीच्या माध्यमातून वास्तविक चित्र मांडले असता येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैधकीय अधिकारी डॉ.वैशाली देवकाते यांनी या पत्रकारला शिवीगाळ ,अपशब्द वापरले आहे. यामुळे बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीने या अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
         याबाबत बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल व वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांना निवेदन देण्यात आली असून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
डोर्लेवाडी येथिल प्राथमिक केंद्रातील बातमी लसी संदर्भातील बातमी  छापून आल्यामुळे येथिल वैधकीय अधिकारी डॉ.वैशाली देवकाते यांनी या संबंधी पत्रकाराला शिवीगाळ, अपशब्द वापरले आहेत.त्यामुळे बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या अधिकाऱ्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.जर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य  कारवाई झाली नाही तर आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
            यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे, उपाध्यक्ष युवराज खोमणे, सचिव चिंतामणी क्षिरसागर, नाविद पठाण, सोमनाथ भिले, विजय मोरे, मंगेश कचरे, सोमनाथ कदम आदी  सदस्य उपस्थित होते. 
To Top