राज्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांबाबत : काय म्हणाले निवडणूक राज्य सचिव यशवंत गिरी ! वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

गेल्या दीड वर्षापासून राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे चार वेळा निवडणुका लागून त्या रद्द झाल्या आहेत. 
           राज्यातील अनेक साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया अर्ध्यावरच थांबवावी लागली होती. फेब्रुवारी नंतर राज्यात कोविड चा प्रादुर्भाव वाढल्याने ३१ ऑगस्ट पर्यंत सर्वच निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. दरम्यान राज्य शासनाने जिल्हा बँक आणि नगरपालिका व नगरपरिषदच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे साखर कारखान्याच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपून दीड वर्ष उलटले आहे. तर दुसरीकडे गुडग्याला बाशिंग बांधून बसलेले  इच्छुक उमेदवार गॅस वर आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. 

यशवंत गिरी - 
सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे
साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचे आदेश हे राज्य शासनाचे आहेत प्राधिकरणाचे नाहीत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार निवडणुका घेण्याचे काम प्राधिकरण करत असते.  ३१ ऑगस्ट नंतर निवडणुका लागणार का पुन्हा लांबणीवर पडणार याबाबत राज्य शासनाने निर्णय घेयचा आहे.
To Top