सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते .
प्रशांत गोेरे हे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनअंतर्गत होमगार्ड या पदावर कार्यरत होते. आज रक्षाबंधननिमित्त त्यांची बहीण राखी बांधण्याकरिता पुण्याहून आली. तिच्याकडून राखी बांधली आणि तिला साडी आणण्यासाठी मोरगाव या ठिकाणी जात असताना एका दुकानात थांबले. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. आसपास असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ मोरगाव येथील एका खाजगी दवाखान्यात नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत यांच्या पाठीमागे आई, वडील एक भाऊ, पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.