मु.सा. काकडे महाविद्यालयात 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मुगुटवर साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे महिला सबलीकरण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दिवसाच्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
         या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारत ज्ञान विज्ञान समुदाय याच्या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य समिती सदस्य व समता कमिटीच्या समन्वयक प्राजक्ता योगेश यादव या उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी भूषवले, यानंतर प्राचार्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्राजक्ता यादव  यांनी राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस का साजरा केला जातो याची पार्श्वभूमी व्यक्त केली, तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व विज्ञानवादी समाजसुधारक कै. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली, त्याच बरोबर दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय महत्त्व आहे? हे उत्तम उदाहरण देऊन स्पष्ट केले. भारताला जगाबरोबर स्पर्धा करावयाची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. रेश्मा पठाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापक नीलिमा निगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीबीए (सीए) विभागाचे उपप्राचार्य रजनीकांत गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव व महिला सबलीकरण समिती सदस्य सतिश लकडे, विनायक आगम, सुचिता साळवे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, त्याच बरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रविण ताटे देशमुख, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, प्राध्यापक मेघा जगताप, IQAC चे समन्वयक डॉ. जाधव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
            महिला सबलीकरण समितीतील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले, त्याचबरोबर प्रा. चेतना तावरे, प्रा. नीलिमा फरांदे, प्रा. प्रगती गुरव यांनी तांत्रिक सहाय्य केले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला.
To Top