सोमेश्वर विद्यालयामध्ये ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र दिनाचे ओचित्य साधून सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर मध्ये ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.                    कोरोनामुळे आज विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे,अशा परिस्थितीत त्याच्या विविध कला गुणांना संधी मिळावी या हेतूने प्रशालाले मध्ये लहान गट इयत्ता ५ वी ते ७ वी इयत्तागणिक व मोठा गट ८ वी ते १० वी अशा गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा,कोरोनामुळे बदलेले जीवन, महापुराचे थैमान, स्वातंत्रपूर्व भारत व स्वातंत्रनंतरचा भारत, असे विषय गटानुसार देण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
    प्राचार्य एस पी जगताप सर यांनी मार्गदर्शन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख धुमाळ एम. बी.,सौ जगताप एस.ए. यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले.
श्री कुलकर्णी एस.एस.,झुरंगे आर .व्ही., महाले वाय.एस., तिटकारे एस.के., सौ शेंडकर आर .एस., खोमणे एम.डी. यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

 निकाल पुढीलप्रमाणे-------------
इयत्ता पाचवी 
प्रथम - कु कृष्णप्रिया उमेश पवार
द्वितीय - कु अमृता नितीन राऊत
तृतीय - कु श्रावणी सुभाष राऊत

इयत्ता सहावी
प्रथम - कु ईश्वरी दत्तात्रय मोहिते
द्वितीय - कु तनिष्का सचिन खैरे
तृतीय - कु अनुष्का दिपक कदम
           चि कार्तिक भंडलकर 

इयत्ता सातवी
प्रथम -चि प्रसाद नंदकुमार जाधव
द्वितीय - सृष्टी सुनील जोशी
तृतीय -श्रेयस तानाजी नरुटे

मोठा गट - 
इयत्ता 8 वी ते 10 वी
प्रथम -कु अनुजा विनोद मोहोळकर
द्वितीय - चि मयुरेश दत्तात्रय खैरे
तृतीय - कु साक्षी किशोर महामुनी
उत्तेजनार्थ-कु.सृष्टी दयानंद रासकर
                कु.समीक्षा दीपक गडदरे
To Top