सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर, येथील मु. सा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर (वाघळवाडी) आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विभागाने covid - 19 जनजागृती साठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचा शुभारंभ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश ) काकडे, सचिव जयवंतराव घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ऋषिकेश धुमाळ संकेत जगताप संजय घाडगे नितीन कुलकर्णी उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे डॉ ताटे-देशमुख IQC चे समन्वयक संजू जाधव विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ देवीदास वायदंडे डॉ श्रीकांत घाडगे वरीष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब मरगजे प्रा दत्तराज जगताप उपस्थित होते. दुचाकी रॅलीत मोठ्याप्रमाणात विद्यार्थी - खेळाडू सहभागी झाले होते. विविध पोस्टर च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.