गांज्याची तस्करी, १३ लाख ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त : एलसीबी पुणे ग्रामीण ची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
         
दिनांक 19/08/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो यांचे आदेशानुसार, पोउपनि. रामेश्वर धोंडगे, सफौ. राजेंद्र थोरात,प्रकाश वाघमारे,मुकुंद कदम,दत्तात्रय जगताप,पोहवा सचिन घाडगे,मुकुंद आयचीत ,प्रमोद नवले पोशी प्राण येवले असे पुणे ते मुंबई रोडने पेट्रोलिंग करीत असताना कामशेत पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे गोवित्री गावाचे जवळ आलो असता गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कामशेत पो स्टे प्रभारी पोनि संजय जगताप , सपोनि आकाश पवार , पोहवा अजय दरेकर यांचे मदतीने एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी  MH 12 GH 4173  नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात कोलवाडी च्या बाजूकडे जाताना दिसली त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने व मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे गाडीची खात्री पटल्याने सदर वाहनास अडथळा आणून पकडले व गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 25 किलोग्रॅम गांजा  मिळून आल्याने  गाडीतील 2 इसमपैकी गाडी चालक व मालक संजय मोहिते रा. गोवित्री ता.मावळ* हा पळून गेला असून दुसरा इसम यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सनील भाऊ केदारी रा.कोलवाडी ता. मावळ जि. पुणे* असे सांगितल्याने तिथून कामशेत पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून  गुन्हा नोंद करण्यात आला असून 03,75,000 रुपये किंमतीचा मुद्देमालसह गांजा  व अंदाजे 10,00,000 रुपये किमतीची जुनी वापरती ब्रिझा गाडी असा एकूण 13,75,000 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी कामशेत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. सदर आरोपी हा सराईत असून यापूर्वी त्याचेवर 02 गुन्हे दाखल आहेत.
          पुढील तपास हा कामशेत पो स्टे प्रभारी अधिकारी पोनि. संजय जगताप हे करीत आहेत.
To Top