व्याजाच्या वसुलीसाठी गाडी घेतली नावावर करून : चौघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -

पुणे औंध येथील उद्योजक नानासाहेब  गायकवाड यांनी केलेल्या  फसवणुकीसंदर्भात तक्रारदार पुढे येऊ लागल्याने आता त्यांच्या अडचणी  वाढणार आहेत. गायकवाड यांनी 
तक्रारदाराकडून प्रतिमहिना ४ टक्के  व्याजदराने दिलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच रकमेची मुद्दल दिली
नाही म्हणून को-या कागदावर सह्या घेत त्यांची मर्सिडिज जबरदस्तीने मुलीच्या नावावर करून घेतली. रक्कम
फेडल्यानंतर गाडी परत मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला बंदुकीतील तीन गोळ्या हवेत झाडून धमकावल्याचा 
प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलीसह राजू दादा अंकुश आणि ड्रायव्हरवर चतु:शृंगी पोलीस  स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
To Top