सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
दागीन्यावरील एच यु आय डी ला बारामती सराफ असोसिएशन चा विरोध आहे मात्र बंद पर्याय नाही. सरकारने वेळोवेळी चर्चेची द्वारे उघडी ठेवली आहेत .व सरकार ईंडीयन बुलियन असोसिएशन च्या मागणीवर सकरात्मक निर्णय करण्यास अनुकूल आहे. सरकार ने नुकताच २५६ जिल्ह्यात हॉलमार्क कायदा अस्तीत्वात आणला आहे .देशात अद्याप नवीन ३५६ नवीन हॉलमार्क सेंटर उभे करायचे आहेत . हॉलमार्क सेंटर कमी असल्याने देशभरात सराफ व्यवसायीकाना हॉलमार्क कायद्याचीच अमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत .त्यातच एच यु आय डी केले तर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत त्यामधे प्रामुख्याने एखादा दागीनी तुटला अथवा त्याची लांबी रुंदी कमी जास्त केल्यास वजनात बदल झाल्यावर ते युनिक आय डी प्रमाणे वजन राहणार नाही. त्याबाबत अद्याप स्पष्ट तरतुदी अथवा धोरण स्पष्ट नाही . एच यु आय डी प्रथम दागीने उत्पादकाला सक्तीचे केले होते तर पुन्हा किरकोळ व्यापारी याने केले तरी चालेल सांगीतले गेले आहे त्याबाबत स्पष्ट धोरण नाही . हॉलमार्क कायदा सर्वानी मान्य केला आहे त्यानुसार २ ग्रॅम च्या वरील प्रत्येक दागीना शुद्धतेच्या कसोटी वर हॉलमार्क सेंटर मधे तपासुनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे या कायद्याची देशभर पुर्ण अमलबजावणी झाकी नसताना देशभरात सर्व जिल्ह्यात हॉलमार्क सेंटर झाले नसताना हा एच यु आय डी सक्ती करण्याला व्यवसायीकांचा विरोध आहे . बारामती सराफ असोसिएशन चा एच यु आय डी ला विरोध आहे मात्र त्यामुळे एच यु आय डी ला विरोध असला तरी बंद हा पर्याय नाही .
गेली अनेक महिने कोरोनाचे संकट असुन आधीच बंद ने सर्वसामान्य सराफ सुवर्णकार त्रस्त झाला आहे कामगारांचे पगार ,दुकान भाडे ,वीज भाडे ,फोन बील सर्व चालुच आहे त्यामुळे व्यवसायीक अडचणीत असताना पुन्हा कोरोना ची लाट आल्यास लॉकडावुन लागण्या ची भीती असताना बंद ठेवल्यास ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य व्यवसायीकांचे मोठे नुकसान होणार आहे . बारामती सराफ असोसिएशन द्वारे सनद शीर मार्गाने एच यु आय डी ला विरोध दर्शविला आहे बारामती ,पुरंदर ,ईंदापुर ,खंडाळा ,फलटण आदी तालुक्याबरोबर ईतर जिल्ह्यात ही बारामती सराफ असोसिएशन चे सभासद आहेत या सर्व सभासदांच्या बंद मुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार करता दर्शविला बारामती सराफ असोसिएशन या बंद मधे सहभागी होणार नाही. असे मत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक , बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर व उपाध्यक्ष चंदुकाका सराफ पेढीचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी व्यक्त केले.
----------------------------
काही वर्षांपूर्वी देशभरातील सराफ व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने अबकारी कर लावला होता, त्यावेळी बारामती सराफ असोसिएशन सह राज्यातील सराफांचे शिष्टमंडळ मा.केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटले होते त्यावेळी शरद पवारांच्या मध्यस्थीने सराफांच्या प्रश्नावर तोडगा निघाला होता..या वेळी देखील सराफांच्या प्रश्नावर आपण खा.शरद पवार, खा.सुप्रियाताई सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसोबत चर्चा करणार असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.