पुरंदर l पारगाव येथे किरकोळ वादातून गोळीबार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

पुरंदर तालुक्यातील पारगाव येथे किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची घटना काल रात्री समोर आली आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान वर नमूद गुन्ह्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळाली घटनेचे गांभीर्य ओळखून जेजुरी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी तात्काळ पारगाव मेमाणे याठिकाणी गेले. त्याठिकाणी प्राथमिक माहिती मिळाली की यातील फिर्यादी यांच्या.वडिलांसोबत आरोपी आदित्य कळमकर व आदित्य चौधरी यांचे फिर्यादी.यांनी लवकर आरोपी ट्रॅक्टरची साईड दिली नाही म्हणून आला त्यावेळेस त्यांच्या मध्ये किरकोळ बाचाबाची झाली. नंतर हे दोन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे इतर 13
साथीदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अशांना बोलून फिर्यादीच्या घरात घुसून हॉकी स्टिक, वाहते लोखंडी हत्यारे यांनी वरील जखमी व फिर्यादी यांना मारहाण केली. 
            गावात दहशत होऊ नये म्हणून त्यांना जे लोक
अटकाव करीत होते त्यातील गणेश मेमाने यांच्यावर एक गोळी फायर केली. परंतु सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही नंतर दहशत व्हावी म्हणून वाघापूर चौकामध्ये सुद्धा त्यांनी हत्यारे काढून नंगानाच केला. राग या घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय
पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी तात्काळ यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत आदेश दिले.
To Top