सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगांव ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा भारत जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे.विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,आ.दिपक चव्हाण,
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली
पाडेगांवच्या लोकनियुक्त सरपंच स्मिता राजेश खरात यांनी अध्यासी अधिकारी म्हणुन उषा भारत जाधव यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहिर केले.या निवडीबद्दल सरपंच स्मिता राजेश खरात तसेच पदाधिकारी व ग्रामस्थानी अभिनंदन केलेले आहे.
निवडणूकीची प्रक्रिया प्रशासकीयदृष्टया पार पाडण्यासाठी निवडणुक निरीक्षक कोळेकर साहेब ,बालविकास प्रकल्प अधिकारी फलटण हे उपस्थित होते.यावेळी पाडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हभप दिलीप झगडे महाराज, चेअरमन दशरथ मोहिते,मा चेअरमन राजेंद्र नेवसे ,मा चेअरमन कांतिलाल रायकर,बाळासाहेब जाधव ,
सतिशकाका पिंगळे ,आबासाहेब जाधव ,
तुळशीराम ताम्हाणे,शेखरकाका खरात ,बिपिनदादा मोहिते,राजाराम भुजबळ,राजेशभाऊ खरात ,रघुनाथ लकडे ,रोहिदास पिंगळे,नितिन जगताप,राजेंद्र अडसुळ,किरण खरात, भानुदास अडसुळ ,ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.