सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व मु.सा काकडे महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित प्राचार्य जवाहर चौधरी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे शारीरिक तंदुरुस्ती व आहार याचे covid-19 महामारीच्या काळात महत्त्व या विषयावर एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. उमेशराज पनेरु शारीरिक शिक्षण संचालक अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांनी पहिला सत्रांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती यावर मार्गदर्शन करून शारीरिक तंदुरुस्तीचे घटक व उतेजक व्यायामप्रकार व शिथीलता व्यायाम प्रकाराचे व्यायाम प्रक्रियेमध्ये असणारे स्थान किती महत्त्वाचे आहे. covid-19 महामारीच्या काळामध्ये घरच्या घरी अथवा ऑफिसमध्ये नियमांचे पालन करून कशा प्रकारे स्वतःला तंदुरुस्त ठेवता येईल. याबाबत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. गौतम जाधव तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांनी शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच आहाराचे जीवनातील स्थान काय आहे. आहार कसा असावा प्रत्येक वयोगटानुसार स्त्री पुरुष यांना लागणाऱ्या कॅलरीज याबद्दल माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा देऊन. मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान व देशप्रेम याबद्दल माहिती सांगितली. संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सचिव जयवंतराव घोरपडे यांनी कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभाग घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सहसचिव सतीश लकडे सर यांनी दोन्ही सत्रातील व्याख्यान ऐकून व्याख्यात्यांचे अभिनंदन केले. प्रा. बाळासाहेब मरगजे शारीरिक शिक्षण संचालक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतरकर्मचारी, विद्यार्थी व महाविद्यालयाशि जोडलेले सर्व संबंधित या सर्वाना covid-19 महामारीच्या काळामध्ये शारीरिक तंदुरुस्ती व आहार याचे जीवनामध्ये असणारे महत्व पटवून सांगणे हा होता.
प्रथम सत्रातील कार्यक्रमाचे आभार प्रा. रजनीकांत गायकवाड उपप्राचार्य बीबीए (सीए) यांनी मानले. संपूर्ण सत्रातील कार्यक्रमाचे आभार आई क्यू एसी समन्वयक डॉ. संजु जाधव यांनी आभार मानून त्यांना पुढील काळात महाविद्यालयात येऊन व्याख्यान देण्याचे आव्हान केले जेणेकरून महाविद्यालय सुरू झाल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा घेता येईल. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे उपप्राचार्य डॉ. जया कदम व उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे यांनी ऑनलाइन उपस्थिती दाखवून दोन्ही सत्रात येतील व्याख्यात्यांचे आभार मानले. या कार्यक्रमात एकूण २१० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती. ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा. संतोष शेळके, प्रा. दत्तराज जगताप कर्मचारी निखिल जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.