आरोग्यदूत घनश्याम केळकर यांचे पुरंदर व बारामती तालुक्याच्या वतीने उत्साहात स्वागत

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

महाराष्ट्रभर पायी आरोग्य महापरिक्रमा करणारे आरोग्यदूत घनश्याम केळकर यांचे पुरंदर व बारामती तालुक्याच्या वतीने उत्साहात स्वागत करत सरकारने प्रत्येकाचा आरोग्यवीमा उतरवावा या मागणीस पाठिंबा देण्यात आला. वीर, नीरा, निंबुत येथेही विविध  सत्कार करण्यात आले.
बारामतीचे रहिवाशी घनश्याम केळकर यांनी मागील वर्षी 17 ऑक्टोबरला रायगड किल्ल्यावरून पायी महापरिक्रमा सुरू केली होती. अकरा महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून पायी वारी करत सरकारने प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत आरोग्यवीमा द्यावा अशी मागणी केली. तसेच स्वतः तयार केलेल्या www. arogyadan.com वेबसाईटवर आरोग्यासाठी मदत आवश्यक असणारे गरजू आणि आरोग्यासाठी मदत देऊ शकणारे दानशूर यांनी नोंदणी करायची आहे. त्यांच्यामध्ये पूल बांधण्याचे काम केले जाणार आहे. हा संदेश घेऊन शनिवारी पुरंदर तालुक्यातील वीर येथील म्हस्कोब देवस्थानचे दर्शन व पाहुणचार घेऊन मांडकी, जेऊर येथून नीरा येथे पोचले. या गावात केळकर यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सदस्य अनिल चव्हाण, अभिजित भालेराव, प्रमोद काकडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. शिवशक्ती धर्मादाय व सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र बरकडे, नवनाथ चोरमले, प्रसाद सोनवणे यांनी सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस नीरा शाखेच्या वतीने अध्यक्षा तनुजा शहा, सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, राष्ट्रवादीचे युवा नेते धैर्यशील काकडे यांनी सत्कार केला. दरम्यान, आज सकाळी निंबुत येथे बारामती तालुक्याच्या वतीने शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे यांनी स्वागत केले
To Top