राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश पदवीधर संघाच्या सोशल मिडिया समन्वयकपदी सुयश जगताप यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदवीधर सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया समन्वयक पदी सुयश सुनिल जगताप नुकतीच निवड करण्यात आली. 
         बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे उपस्थिती मध्ये मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जगताप यांना सुळे यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती देण्यात आली. राष्ट्रवादी कांग्रेस पदवीधर सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मान्यतेने जगताप यांची  राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या सोशल मिडिया समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे,  
           राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जगताप हे पक्षवाढीसाठी  सतत काम करतात तसेच पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व पदवीधरांच्या उन्नती,प्रगती व  संघटन वाढीसाठी या पुढील काळात सदैव कार्यरत राहुन सर्व तरूण कार्यकत्यांना विश्वासात घेऊन व जेष्ठांचा मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार यापुढील काळात कार्य करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली, त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेवुन त्यांना ही पोहचपावती मिळाली आहे ,
To Top