सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर यश नक्की मिळते असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी केले.
बारामती येथील देवगिरी करिअर अकॅडमी च्या वतीने एस आर पी एफ मध्ये निवड झालेले राकेश गवळी व धर्मेंद्र नाणवर यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
या वेळी देवगिरी अकॅडमी चे अध्यक्ष एम व्ही चोपडे, संचालक ऍड संतोष चोपडे, पोदार जम्बो किड्स चे संचालक तुकाराम पवार,ओंकार पवार, क्रीडा प्रशिक्षक गोपाल वाघमारे,सूरज झगडे,संकेत आटोळे,मिरल प्रजापती,मोनिका झगडे आदी मान्यवर उपस्तीत होते
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूडगंड न बाळगता यशाचा पाठलाग करताना चौफेर वाचन व मैदानी खेळा कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे व निवड झाल्यावर कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपावी आई वडील,गाव व देशाचे नाव उज्जवल करावे असेही नितीन शेंडे यांनी सांगितले यावेळी निवड झालेले राकेश गवळी व धर्मेंद्र नाणवर यांनी अनुभव कथन केले.
सुत्रसंचालन एम व्ही चोपडे यांनी केले तर आभार गोपाल वाघमारे यांनी मानले.