सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील निंबुत येथील कमल रामभाऊ लकडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या नेत्र तपासणीत २०० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये ५० लोकांना चष्मावाटप करण्यात आले तसेच ६ जणांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. यासाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे यांनी सहकार्य केले. निंबुत चे माजी सरपंच संपतराव लकडे व माजी सदस्य विजय लकडे यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फरांदे महाराज यांचे कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.