सोमेश्वर रिपोर्टर टीम-----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे वातावरण तापायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या गाववोगावी बैठका सुरू आहेत. बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या तालुक्यातील कार्यक्षेत्रा मधील गावे असल्याने प्रचाराच्या पाच दिवसात प्रचार करणे मुश्कील आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद संपर्क दौरा सध्या अनेक गावांत पोहचत आहे. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे आदी राष्ट्रवादीचे मातब्बर पदाधिकारी गाव भेट दौऱ्यात सहभागी होऊन सभासदांची मते जाणून घेत आहेत.
आज पर्यत झालेल्या सभासद दौऱ्यात गावातील सभासद कारखान्यात किमान दोन उमेदवाराना संधी मिळावी अशी मागणी करत आहेत. राष्ट्रवादीकडील स्थनिक स्वराज संस्था यात जिल्हा परिषद व पंचायत समिती तर खरेदी विक्री संघ, दूध संघ तसेच इतर अशासकीय पदे अनेक गावांत राष्ट्रवादी कडून देण्यात अली आहेत. परंतु याला वाघळवाडी गाव अपवाद आहे.वरील कोणत्याच ठिकाणी संधी मिळाली नसल्याने तसेच सोमेश्वर कारखाना उभारणीसाठी गावातील सभासद आणि ग्रामस्थांनी जागा देऊन सहकार्य केल्याचे ग्रामस्थांनी राष्ट्रवादी च्या सभासद संपर्क दौऱ्यात बोलून दाखविले.
वाघळवाडीतील ग्रामस्थांनी गाव बैठक घेऊन राष्ट्रवादी कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यापैकी कोणत्याही एका उमदेवाराला उमेदवारी द्यावी असे ठरले त्याचे सह्यांचे निवेदन अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मध्ये वाघळवाडीत शिक्षण संस्था स्थापन केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्व हनुमंतराव सावंत यांचे चिरंजीव समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांचा युवा चेहरा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल आहे. अजिंक्य सावंत यांच्यासह वाघळवाडी गावातून अजून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मुरूम - वाल्हा या 2 गटातून अनेक दिग्गजाचे अर्ज दाखल आहेत. याच गटातून सध्याचे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या रसीखेस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालेल्या मेळाव्यात युवा चेहरा आणि जेष्ठांचा मिळुन उमेदवारी देणार असल्याचे सांगितले आहे. यात वाघळवाडीला युवकांना संधी देणार की महिलांना उमेदवारीची संधी देऊन राष्ट्रवादी पक्ष वाघळवाडीला न्याय देणार का? हे येत्या दोन दिवसात समजणार आहे.
कारखाना स्थापनेपासून वाघळवाडीला संधी-------
सोमेश्वर कारखाना हा वाघळवाडी हद्दीत असून सोमेश्वर कारखान्याच्या स्थापनेपासून वाघळवाडी गावातून अद्याप कुणालाच संधी देण्यात आली नाही. यावेळी तरी संधी मिळणार का ? का पुन्हा वाघळवाडीला संचालक पदापासून वंचित राहावे लागणार?