शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सोमेश्वरच्या निवडणुकीबाबत घेतला हा मोठा निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित शेतकरी कृती समिती आपला पॅनेल उभा करणार नसल्याचा मोठा निर्णय शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी घेतला आहे. 
          निंबुत ता बारामती येथे आयोजित केलेल्या कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
यावेळी बोलताना सतीश काकडे म्हणाले,कृती समितीमधील ज्या कोणाला दुसऱ्या पॅनेलमध्ये जायचे असेल ते बिनधास्त जाऊ शकतात. कृती समितीकडे असलेले ५५ उमेदवारांच्या अर्जाची विड्रॉल्स ते नेऊ शकतात. नंतर कोणी नाराज होणार असेल तर अशांनी आताच  दुसऱ्या पॅनेलमध्ये गेले तर काही हरकत नाही. मात्र विरोधी पक्षात जाण्याचा काहीच संबध नाही असा सुरु कृती समिती मधील कार्यकर्त्यांनी लावला. कृती समितीचा निर्णय सर्वानी मान्य करत कृती समितीतच राहण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.
To Top