टिपर मधुन पडलेला दगड भिंगरी सारखा भिरभिरत येतो आणि त्याचा पाय फॅक्चर करून जातो : टिपर चालकांच्या मजोरीला ब्रेक लागणार का ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

टिपर मध्ये ड्रायव्हर सीटवर बसला की त्याला वाटतं आपण हेलिकॉप्टरच चालवतोय...सोमेश्वरनगर परिसरात टिपर आणि हायवा ड्रायव्हरांच्या मजोरीला नागरिक वैतागले असून यांच्यावर कधी आळा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
          टिपर अथवा हायवा घेणाऱ्या मालकांनी ड्रायव्हरला एकदा का ड्रायव्हरच्या खुर्ची वर बसवले की त्याला रस्त्याने येणारी जाणारी माणसे मुंगी सारखी वाटतात... रहदारीच्या रस्त्यावरूनही हे टिपर व हायवा चालक ६० ते ७० च्या वेगाने  गाडी चालवत असतात...
        सोमेश्वरनगर येथे दुपारी असाच एक अपघात घडला. वाहतुक (अनेक टिपर अथवा हायवा हे अवैधच वाहतूक करत असतात) करणाऱ्या टिपर मधून एक दगड डांबरी रस्त्यावर पडला आणि वेगाने रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या एका जणांच्या पायावर जाऊन आदळला यामध्ये त्या माणसाच्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. या मजोरी चालकांचया वेगाला ब्रेक लागत नसुन त्यांच्या बेफाम स्पीडमुळे अनेक अपघाताला निमंत्रण मिळत असुन लोकांचा जीव गेल्यावरच टिपरचालकांचा ब्रेकवर आळा बसेल का असा सवाल परीसरातील नागरीक व्यक्त करीत आहेत. 
यातुन भविष्यात मोठी जिवीतहानी घडण्यापुर्वीच पोलिस याच्यांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
To Top