सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. २० सप्टेंबरपासून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होणार असून पुन्हा एकदा भाजपने सोमेश्वर च्या निवडणुकीत दंड थोपटले असून भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतणार असल्याचे पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर' बोलताना सांगितले.
सोमेश्वर कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीत भाजप भूमिका ही स्पष्ट असणार असून सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात सर्व जागेंवर भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून लवकरच भाजप सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात संपर्क सुरू करणार असल्याचे दिलीप खैरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सोमेश्वर कारखान्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ३१०० रुपये दर जाहीर केला आहे. हाच दर मागे का नाही दिला. वास्तविक सद्याचे साखरेचे दर पाहता सभासदांना अजून अधिकचे टनाला ३०० रुपये मिळणे अपेक्षित असल्याचे खैरे यांनी सांगितले.