सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरणाने दि २० सप्टेंबरपासून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा आदेश काढला आहे. त्यातच दि २९ रोजी सोमेश्वर कारखान्याची वार्षिक सभा होणार आहे. ही सभा ऑनलाईन असली तरी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वार्षिक सभेची जुगलबंदी रंगणार आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या संस्थेची सन २०२०-२०२१ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार / आदेशानुसार बुधवार दिनांक २९/०९/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन (Other Audio Visual Means) पध्दतीने खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी आयोजित केलेली आहे. तरी सदर सभेमध्ये आपण ऑनलाईन पध्दतीने सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
सभेपुढील विषय
१) मागील दि. २९/३/२०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) संस्थेचे सन २०२० २०२१ या वर्षाचा मा. संचालक मंडळाकडून आलेला अहवाल ताळेबंद व नफातोटा
दाखल करून घेणे व त्याचा स्विकार करणे.
३) सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास
संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजूरी देणेबाबत विचार करणे.
४) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरीता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणीबाबतची नोंद घेणे.
५) वैधानिक लेखा परीक्षक यांनी कारखान्याच्या सन २०२०-२०२१ या वर्षाच्या दिलेल्या लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे मागील सन २०१९-२०२० या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालाचा मा. संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे.
६) सन २०२१-२०२२ वर्षाकरीता शासनमान्य लेखापरिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा परिक्षकांची करणे व लेखापरिक्षण शुल्क ठरविणे.
७) सभासद भागाची (शेअर्स) दर्शनी मुल्यांमध्ये वाढ करणेबाबत महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग
विभाग, मुंबई यांचे दि.१८/०५/२०२१ रोजीच्या शासन आदेशाची नोंद घेवून पुढील कार्यवाही करणे.
८) जुन्या येणे रक्कमा निर्लेखित (राईट ऑफ) करणेबाबत विचार करणे.
कारखाना कार्यक्षेत्रातील नव्याने विभाजन झालेल्या गावांचा पोटनियमामध्ये समावेश करणेचा निर्णय घेणे.
(१०) मा. अध्यक्षसो यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणान्या विषयांवर विचार करणे.