सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील जुबिलंट मध्ये स्थानिकांना नोकऱ्या लावतो असे खोटे आश्वासन देऊन काही लोक मोर्चे काढणार आहेत. ते बनावट लोक असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन करून सद्या कंपनीत कोणत्याही प्रकारची भरती नसून येणाऱ्या काळात आम्ही स्थानिक भूमीपूत्रांची प्राधान्याने कामे करणार असल्याचे जुबिलंट कामगार युनियनचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सांगितले.
निंबुत ता बारामती येथे ते 'सोमेश्वर रिपोर्टर' शी बोलत होते. ते पुढे म्हणाले, १५ तारखेला काही बोगस कामगार संघटना मोर्चे काढणार असून परिसरात त्यांनी फॉर्म वाटप सुरू केले आहे. स्थानिक युवकांना कंपनीत परमनंट करण्याचे आमिष दसखवले जात आहे. ते कागोदपत्री अध्यक्ष नाहीत त्यांना कोणताही अधिकार नाही असे सांगून जुबिलंट कामगार युनियनच्या नावाखाली हे लोक काहीही करत असल्याने आमच्या संघटनेची व परिसराची बदनामी होत आहे. मोर्चे काढणारे लोक हे बनावट असून अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की सद्या कंपनीत कोणतीही भरती होणार नाही. भविष्यात निश्चित स्थानिक युवकांचा विचार केला जाणार आहे. उद्या जे आंदोलन होणार आहे त्यात जुबिलंट कामगार युनियनचा कोणताही संबंध नाही. स्वयंघोषित अध्यक्ष हे स्थानिक आहे का? आणि हे काय भूमिपुत्रांना न्याय देणार? ज्या माणसांमुळे कंपनीतील ६०० चे कामगार ७० वर आले अशांनी कामगारांच्या भल्याचा कंगवा करू नये.