सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आम्ही मागील अडीच वर्षांपासून कार्यरत असलेली ज्युबिलंट कामगार युनियनच अधिकृत असून जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्देशानुसार कंपनी व्यवस्थापणानेही ते मान्य केले आहे. यशवंत भोसले यांची अध्यक्ष निवड बोगस असून त्यांच्या गटाच्या चारही जणांची संघटनेच्या कार्यकारिणीतून हकालपट्टी झाली आहे, असा हल्लाबोल ज्युबिलंत युनियनचे अध्यक्ष सतीश काकडे व सचिव सुनिलदत्त देशमुख यांनी केला आहे.
जुबिलंट कामगार युनियन ने निंबुत ता बारामती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत युनियनचे अध्यक्ष सतीश काकडे व सचिव सुनील देशमुख बोलत होते. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे, यशवंत आनंदराव भोसले, आणि त्यांचे साथीदार शिवाजी परशुराम लोखंडे, अनिल दत्तात्रय कोंडे,=दिलीप सर्जेराव अडसुळ, रमेश पांडुरंग जेधे या व्यक्तींनी केलेली
बेकायदेशीर व कामगार चळवळीस काळीमा फासणारी कृत्ये असल्याचा या पत्रकात म्हणटले आहे. यामध्ये ज्युबिलंट कामगार युनियन ही संघटना, ज्युबिलंट एन्ग्रेव्हीया लि. मु. निंबुत, पो. निरा, ता. बारामती जि. पुणे या व्यवस्थापनातील सर्व ७० कायम कामगारांचे नेतृत्व करते, आमच्या संघटनेच्या निवडणुका सन १८/०१/२०१९ रोजी होवून त्यामध्ये लोकशाही पद्धतीने मतदानाने नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. नव्या कार्यकारीणीबाबतची सर्व माहीती आमच्या संघटनेने मा. कामगार आयुक्त कार्यालय आणि कंपनी व्यवस्थापनाला पत्र देवून दिलेली होती. त्यानंतर गेल्या अडीच ते तीन वर्षांत आमची संघटना आणि कंपनी यांच्यातील संबंध अत्यंत सलोख्याचे आणि बांधीलकीचे आहेत. आमच्या संघटनेचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्या पुढाकाराने आणि सभासद कामगारांच्या एकीमुळे संघटनेने कंपनी व्यवस्थापनाबरोबर माहे जुन २०२१ मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला. अशा झालेल्या करारावर कंपनीचे सर्व कामगार समाधानी आहेत. मात्र दि. ०६/०७/२०२१ रोजी आम्हाला मिळालेल्या माहीतीनुसार आपल्या कंपनीला मा. सहा कामगार आयुक्त कार्यालय, वाकडेवाडी, पुणे यांना आमच्या संघटनेच्या नावाने काही त्रयस्थ व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयाला पत्रव्यवहार केल्याचे आम्हाला कळाले. त्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यालयास भेट दिल्यावर आमच्या निदर्शनास आले की, आमच्या संघटनेचे लेटरहेड आणि शिक्के बनावट पद्धतीने तयार करुन किंवा चोरी करुन त्याचा गैरवापर करत आमच्या संघटनेच्या कार्यकारीणीमध्ये आणि अध्यक्ष पदामध्ये बदल झाल्याचे संगनमताने कट-करस्थान रचुन फसवणुक करण्याच्या इराद्याने सदर कार्यालयास खोटी माहीती दिली. अशी खोटी माहीती इसम नामे यशवंत आनंदराव भोसले याने आमच्याच संघटनेत पुर्वी असणाऱ्या व्यक्ती श्री शिवाजी परशुराम लोखंडे, श्री. अनिल दत्तात्रय कोंडे, श्री. दिलीप सर्जेराव अडसुळ, रमेश पांडुरंग जेधे यांच्या संगनमताने दिल्याचे आम्हाला कळाले.
हकालपट्टी केलेली आहे व रिक्त जागांवर संघटनेच्या घटनेनुसार नविन ४ सदस्यांची नेमणुक देखिल केली आहे ती खालीलप्रमाणे ::
जनार्दन छबनराव काकडे, सदस्य,
ज्योतीराम शामराव कदम, सदस्य.
अशोक शिवराम पोकळे, सदस्य.
. सुभाष तात्यासाहेब खलाटे, सदस्य
आमच्या संघटनेने त्रयस्थ व्यक्तींच्या अशा वर्तनाची गंभीर दखल घेवून त्यांच्या विरुद्ध मा.कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांच्याकडे तक्रार दाखल केली. सदर प्रकरणी त्यांनी सुनावणी घेवून सत्यपरिस्थितीची माहीती अप्पर कामगार आयुक्त, सहा कामगार आयुक्त, पुणे यांना पाचारण करुन जाणुन घेतली. सदर व्यक्तीविरुद्ध संघटनेने दाखल केलेल्या तक्रारी आणि कागदपत्रे सुर्पुत केली. तसेच ज्युबिलंट एन्ग्रेव्हीया लि. या कंपनीच्या व्यवस्थापनेने ज्युबिलंट कामगार युनियन, निंबुत पो. निरा, ता.बारामती जि.पुणे या संघटनेचे अध्यक्ष सतीश काकडे व जन.सेक्रेटरी सुनिलदत्त देशमुख आहेत असे सुनावणी दरम्यान सुचित करुन अधिकृत पत्रही दिले. तसेच आमच्या संघटनेने त्रयस्थ व्यक्तींच्या अशा वर्तनाची गंभीर दखल घेवून त्यांच्या विरुद्ध वडगांव निंबाळकर, जेजुरी पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केल्या आहेत व लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल होतिल. तसेच आमच्या संघटनेची सर्व माध्यमातून कुठलाही आधार नसताना बदनामी केली त्यासंदर्भातही आम्ही लवकरच त्रयस्थ व्यक्तींच्या विरुद्ध अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार आहोत.