सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पणदरे ता. बारामती जि. पुणे ते खडीमशीन खामगळवाडी ढाकाळे ता.बारामती जि.पुणे या दरम्यान निरा बारामती मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वादय वाजवित व मोठ-मोठयाने घोषणा देत विनापरवाना रॅली काढुन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वाजवी आदेशाचा अवमान केलेल्या प्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पो कॉ. ज्ञानेश्वर पांडुरंग सानप यांनी फिर्याद दिली आहे. यावरून1) विकम भरत कोकरे रा. पणदरे ता. बारामती जि.पुणे 2) ज्ञानदेव श्रीरंग खामगळ 3) शशिकांत जयसिंग खामगळ 4) प्रशांत ज्ञानदेव खामगळ अ.क 2 ते 4 हे सर्व रा. खामगळवाडी ढाकाळे ता.बारामती जि.पुणे 5) अरविंद बनसोडे (पुर्ण नाव माहीत नाही) रा. माळेगाव ता. बारामती जि.पुणे 6) विलास महादेव कोकरे रा. ढाकाळे ता. बारामती जि.पुणे 7) अँड अभिजीत शिवाजी जगताप 8) राजेंद्र झुंबर गायकवाड 9) अमोल जगु सोनवणे 10) प्रताप उर्फ लखन ज्ञानदेव सोनवणे 11) संतोष मारुती काळे 12) सचिन संपतराव निंबाळकर 13) योगेश ज्ञानेश्वर जगताप 14) भिवा महादेव भिसे 15) अर्जुन राघु सोनवणे अ.क 6 ते 15 सर्व रा. पणदरे ता बारामती जि.पुणे 16) ऋषिकेश दत्तात्रय भोसले रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती जि. पुणे व इतर अनोळखी 10 ते 15 लोक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हकिकत- वर नमुद केले ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की,वर नमुद केले आरोपी नं.1 ते 16 व इतर अनोळखी 10 ते 15 लोकांनी विनापरवाना जमाव जमवुन कोणतेही सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) न राखता एकत्र जमुन ग्रा.पं. कार्यालय पणदरे ता. बारामती जि. पुणे ते खडीमशीन खामगळवाडी ढाकाळे ता.बारामती जि.पुणे या दरम्यान निरा बारामती मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वादय वाजवित व मोठ-मोठयाने घोषणा देत विनापरवाना रॅली काढुन मा. जिल्हाधिकारी सो, पुणे यांनी दिलेल्या वाजवी आदेशाचा अवमान केलेला असुन कोरोना सारख्या मानवी जिवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली हयगयीची व घातकी कृती करुन मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांचे कार्यालयाकडील वर नमुद केले आदेशाचा संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्हयात अंमल जारी असताना देखील त्यांनी दिलेल्या वाजवी आदेशाची अवज्ञा केलेने माझी वरील नमुद इसम अ.नं. 1ते 16 व इतर अनोळखी 10 ते 15 इसम यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 269,270,188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब) तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथीचे रोग प्रतिबंधक का.क.2,3,4 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 134,135 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.वगैरे मा चे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल करुन त्याचा प्रथम खबरी अहवाल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती यांना पाठवला असुन त्याचा पुढील तपास पो ना सातव हे करीत आहेत