सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती l चोपडज येथील दोन सराईत गुन्हेगार चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार

सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 

बारामती तालुक्यातील चोपडज येथील दोन सराईत धोकादायक अशा  गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे, सातारा, सोलापुर, अहमदनगर जिल्हयातुन तडीपार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा तडीपार प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. 
         वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हृददीतील सराईत आरोपी  गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडज ता. बारामती जि.पुणे या दोन सराईत गुन्हेगार यांचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये बेकायदा लोकांची गर्दी जमविणे, मारहाणीसह खुनाचा प्रयत्न, अनाधिकराने घरात प्रवेश करून जबर मारहाण करून जखमी करणे तसेच शिविगाळ व दमदाटी करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झालेले होते. भविष्यात देखील सदर आरोपी काहीएक कामधंदा न करता त्यांचे साथीदारासह दारु पिवुन मौजे चोपडज गावातील गोरगरीब लोकांना विनाकारण त्रास देणे, तसेच अनेक गुन्हयामध्ये या दोन सराईत गुन्हेगारांना अटक झालेली आहे, तसेच त्यांचे वर्तणुकीमध्ये बदल होवुन सुधारणा व्हावी याकरीता प्रतिबंधात्मक कारवाई देखील करणेत आलेली होती. परंतु त्यांचे वर्तुणुकीमध्ये सुधारणा न झालेने व भविष्यात देखील सराईत आरोपी नामे गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडज ता. बारामती जि.पुणे या दोन गुन्हेगारांचे हातुन मौजे चोपडज ता. बारामती जि.पुणे या गावातील तसेच परीसरातील नागरीकांच्या जिवीतास तसेच मालमत्तेस धोका या सारखे गंभीर गुन्हे घडणेची दाट शक्यता निर्माण झाले कारणाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि. सोमनाथ लांडे यांनी सदर आरोपींच्या धोकादायक कृतीस प्रतिबंध व्हावा व समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सदर आरोपींना मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ (ब) प्रमाणे हदपार करणेसाठी मा. श्री. नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा. श्री. दादासाहेब कांबळे, उपविभागीय दंडाधिकारी बारामती इंदापुर उपविभाग, बारामती यांचे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.
       सदर प्रस्तावावर मा. उपविभागीय दंडाधिकारी बारामती इंदापुर उपविभाग, बारामती यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचा अभिप्राय व नियोजित हृदपार इसम यांचे लेखी म्हणणे व तोंडी युक्तीवाद ऐकुन त्यातील निष्कर्षामध्ये विवेचन केलेल्या कारणांचा विचार करुन मा. श्री. दादासाहेब कांबळे उपविभागीय दंडाधिकारी बारामती-इंदापुर उपविभाग, बारामती यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे सराईत आरोपी नामे गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडन ता. बारामती जि.पुणे या दोन गुन्हेगारांना पुणे जिल्हयातील बारामती इंदापुर तालुक्याच्या सरहददीतुन दिनांक १३/०९/२०२१ रोजीपासुन पुणे, सातारा, सोलापुर, अहमदनगर जिल्हयाचे कार्यक्षेत्राचे स्थळसिमेमध्ये १ वर्षासाठी प्रवेश न करणेबाबत किंवा पुन्हा न परतणे बाबत आदेश दिलेला आहे.
   सदरची कामगिरी ही मा. श्री. अभिनव देशमुख सो, मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलिंद मोहीते सो, अपर पोलीस अधिक्षक सो बारामती, मा. श्री. नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि श्री सोमनाथ लांडे यांनी केलेली आहे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7023,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती l चोपडज येथील दोन सराईत गुन्हेगार चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार
बारामती l चोपडज येथील दोन सराईत गुन्हेगार चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार
https://lh3.googleusercontent.com/-Dt_pacBg-vs/YUDOXFCL9LI/AAAAAAAALfM/6bTT6QPU19Mm6SGy_K0uCqrxb1cTUfhlgCLcBGAsYHQ/s1600/1631637078816389-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Dt_pacBg-vs/YUDOXFCL9LI/AAAAAAAALfM/6bTT6QPU19Mm6SGy_K0uCqrxb1cTUfhlgCLcBGAsYHQ/s72-c/1631637078816389-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/09/l_14.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/09/l_14.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy