सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
२० सप्टेंबर नंतर सोमेश्वर कारखान्याची रणधुमाळी सुरू होत आहे. त्या अनुषंगाने आज वाघळवाडी येथे सोमेश्वर मंगल पॅलेस येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम जगताप
चेअरमन, श्री सोमेश्वर सह.सा.कारखाना व संभाजी होळकर अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिली. या मेळाव्याला दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
आज ४ वाजता सोमेश्वर पॅलेस-अक्षय गार्डन शेजारी, वाघळवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत सोमेश्वर कारखाना निवडणुक अनुशंगाने शेतकरी मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भरण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुकांच्या मांदियाळीला काय कानमंत्र देणार याबाबत सभासदांच्या उत्सुकता आहे.