सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद प्रतिनिधी
कोपर्डे ता खंडाळा येथील विवाहितेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी सासरच्या घरी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कोपर्डे ता खंडाळा येथील चंद्रशेखर शिंदे व सौ. मयुरी शिंदे हे दाम्पत्य गुजरात येथील नवसारी येथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास होते. यामधील सौ.मयुरी चंद्रशेखर शिंदे वय २८ हि विवाहिता बारामती तालुक्यातील पणदरे येथील असून तिने गुजरात येथे आत्महत्या केली होती. याबाबत सासरचे लोक मानपान तसेच सोने कमी दिले म्हणून 26 एप्रिल 2016 पासून तिचा छळ करत होते. तिच्या आत्महत्येस सासरे उत्तमराव शिंदे सासु बेबी शिंदे , नवरा चंद्रशेखर शिंदे , दिर प्रशांत शिंदे, नणंदा मुली संगीता भोसले, स्वाती काकडे मंगल कदम हे जबाबदार असुन सासरचे लोकांचे विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केले प्रकरणी गुजरात येथै गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दिनांक १७ रोजी सकाळी माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्या दारातच मयुरीला अग्नी दिला. यावेळी नातेवाईकांच्यात वादवादीचा प्रसंग उद्भवल्याने घटनास्थळी जावुन लोणंद पोलीसांनी मध्यस्ती करत तणावाची परिस्थिती हाताळत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व लोणंद पोलिसांनी शांततेने प्रकरण हाताळत दोन्ही बाजूकडील नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले.