सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवार अर्ज मागे घेण्यास तब्बल १५ दिवसांचा कालावधी तर प्रचाराला अवघे ४ दिवस मिळाले आहेत. ज्या ठिकाणी निवडणूक थांबली होती तिथून पुढे ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम------
उमेदवारी अर्ज मागे घेणे -
२० सप्टेंबर २१ ते ४ ऑक्टोबर २१
११ ते ३ या वेळेत
उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप--
५ ऑक्टोबर २१ सकाळी ११ वाजता
प्रचार---
६ ऑक्टोबर २१ ते १० ऑक्टोबर २१
मतदान----
१२ ऑक्टोबर २१ सकाळी ८ ते ५
मतमोजणी व निकाल----
१४ ऑक्टोबर २१ रोजी सकाळी ९ पासून मतमोजणी संपेपर्यंत