सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर आतापर्यंत कै. वसंतकाका जगताप, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, पुरुषोत्तम जगताप यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. माळेगाव ला कुठलं ही संचालक मंडळ आलं तरी ते तावरेच त्यामुळे भविष्यात माळेगाव कारखान्यात तावरे सोडून संधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुरंदर चे आमदार संजय जगताप, पुरुषोत्तम जगताप, प्रमोद काकडे, संभाजी होळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.