ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनीत महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा : कोमल निगडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

निंबुत ता बारामती येथील ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनी मध्ये महिलांना कायम रोजगार संधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या महिला उपाध्यक्ष कोमल निगडे यांनी निवेदनाद्वारे खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली आहे. 
           कोमल निगडे यांनी खा. सुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजच सर्वच क्षेत्रामध्ये महिला जोमाने काम करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत, परंतु ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनी निंबुत निरा मध्ये महिलांना रोजगाराची संधी नाकारली जात आहे. तरी निरा पंचक्रोधीतील सर्वसाधारण व पात्र महिला व कंपनीचे मयत कामगारांचे
कुटुंबातील महिलांना ज्युबिलंट इनग्रेव्हिया कंपनी मध्ये कायम रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे बाबत आपणाकडुन आदेश व्हावेत असे निवेदनात म्हटले आहे.
To Top