सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
दौंडज (ता.पुरंदर ) हद्दीत तरसदरा खिंडीजवळील जेजुरी नीरा लोहमार्गावर रेल्वेची धडक बसल्याने एका वृद्ध अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत वाल्हे पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि .२९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजल्याच्या सुमारास दौंडज गावाच्या हद्दीत तरसदरा खिंडीजवळ जेजुरी नीरा लोहमार्ग न. ६३ / ६ / ७ येथे एक वृद्ध इसम रेल्वेच्या मालगाडी समोर अचानक आल्याने अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्यास व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान मयताच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा बरमुडा तसेच पांढरे केस व रंग सावळा असे वर्णनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप, संतोष मदने, समीर हिरगुडे हे करित आहेत.