सोमेश्वरनगर येथील प्रेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना पडलेले पैशांचे पाकीट एकाने प्रामाणिकपणे परत केल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
वडगाव निंबाळकर येथील तानाजी गायकवाड यांचे शेतात माती ओढायचे काम सुरू होते. काम करणाऱ्या जेसीबी मालकाला पैसे देण्यासाठी गायकवाड यांनी एका मित्राकडून १९ हजार रुपये उसनवारीने घेतले व सोमेश्वरनगर येथील व पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना त्यांचे हे पाकीट पंप हद्दीत पडले. ते दादा पाटोळे (शेंडकरवाडी) व राजाभाऊ पाटोळे रा. बीड सध्या रा. निंबुत या दोघांना सापडेले यावर दोघांनीही हे पाकीट कुणाचे आहे अशी चौकशी केली. त्याठिकाणी कोणाचं माझे आहे असे म्हणटले नाही यावर दादा पाटोळे व राजाभाऊ पाटोळे हे निघून गेली. पाकीट हरवल्या मुले गायकवाड हे चलबिचल झाले. पंप इनचार्ज दत्ता माळशिकारे यांचेकडे गेले. माझे पैशांचे पाकीट पडले आणि ते कुणीतरी नेले म्हणत ढसाढसा रडले. दत्ता माळशिकारे यांनी तातडीने पोलिसांना ही कल्पना दिली. पोलिसांनी तातडीने पंपावरील सीसीटीव्ही फुटेज काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. व सोमेश्वर नगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हे सर्व करत असतानाच ज्यांना हे पाकीट सापडले आहे त्यांनी स्वतः होऊन ते पोलीस स्टेशनला आणून दिले. आज सकाळी सपोनि सोमनाथ लांडे व सपोउनी योगेश शेलार यांच्या हस्ते ही रक्कम संबंधितांना देण्यात आली.