सभासदांसाठी खुशखबर ! 'सोमेश्वर' देणार दिवाळीसाठी प्रतिकार्ड तब्बल एवढी साखर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवाळीसाठी सभासदांना प्रतिकार्ड ३० किलो तर कामगारांसाठी १० किलो साखर १५ रुपये दराप्रमाणे देणार आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 
            याबाबत कारखान्याने परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये म्हंटले आहे, कारखान्याचे सर्व सभासद बंधू भगिनी व कामगार यांना कळविणेत येते की, माहे नोव्हेंबर मध्ये "दिपावलीचा सण येत आहे व अजून राज्यामध्ये कोरोनाचे सावट त्यामुळे साखर खरेदीसाठी  गर्दी होऊ नये याकरीता कारखाना व्यवस्थापनाने सवलत दराने सभासदांना दिपावलीच्या सणाकरीता वाटप करणेत येणारी साखर ही दि.०१/१० पासून खालील तपसिलाप्रमाणे वाटप करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
         तरी माहे ३१ डिसेंबर २०२१ अखेर दिपावलीची साखर घेवून जाणेची खबरदारी अन्यथा मुदतीत साखर नेहमेची राहिल्यास ती कोणत्याही परिस्थितीत मुदतीनंतर दिली ज नाही याची नोंद घ्यावी व आपली हक्काची साखर कारखान्याने घालून दिलेल्या मुदतीत जाऊन कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे ही विनंती.
To Top