मोठी बातमी ! सोमेश्वर कारखान्याचे सहकारी तत्त्वावरील हॉस्पिटल होणार : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

गेल्या दीड वर्षांपासून कोविड च्या आजाराच्या आर्थिक खर्चामुळे अनेक कुटुंब अक्षरशः मोडून पडली आहेत त्यासाठी सोमेश्वरनगर परिसरात सहकारी तत्वावर हॉस्पिटल बांधण्याचा संचालक मंडळाचा संकल्प असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. 
        सोमेश्वर कारखान्याच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष जगताप यांनी हा प्रस्ताव सभासदांपुढे मांडला आहे. येणाऱ्या काळात सोमेश्वर कारखाना सोमेश्वर नगर या ठिकाणी सहकारी तत्त्वावरील १०० बेडच हॉस्पिटल करण्याचा मानस असून सर्व उपचार एकाच ठिकाणी केले जाणार आहेत. अत्यल्प खर्चात ही सेवा उपलब्ध होणार आहे अशी माहिती अध्यक्ष जगताप यांनी दिली. 
To Top