सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गेल्या वर्षी २९ मार्च रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यालयीन अधीक्षक कालिदास निकम यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ऑनलाईन संभाजी होळकर, अध्यक्ष शहाजी काकडे, दत्ताआबा चव्हाण, सुनील भोसले, बाळासाहेब गायकवाड, कौस्तुभ चव्हाण, मदन काकडे विजय सोरटे, गौतम काकडे, कांचन निगडे, हेमंत गायकवाड, सचीन टेकवडे आदींनी सहभाग घेतला.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध, व संचालक मंडळात वाघळवाडी गावचे कोणी संचालक नसते. याबाबत विचार व्हावा अशी मागणी अजिंक्य सावंत यांनी केली.