सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मगरवाडी ता बारामती येथील रोहन प्रवीण कोंढाळकर रस्त्यावरून दुचाकी घरसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहन हा दुचाकी वरून सोमेश्वर देवस्थान येथे आला होता. पुन्हा साडेसात वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर मंदिराकडून मगरवाडी येथे आपल्या घरी जाताना रस्त्यावरून गाडी घसरली ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दहा फूट खड्यात पडली यामध्ये रोहनला डोक्याला जबर मार लागला होता. त्याला उपचाराला सोमेश्वरनगर येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर पुण्याला दवाखान्यात नेत असतानाच रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली.