सोमेश्वर रिपोर्टर टीम------
आ. रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त द रॉयल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन हजार मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते शालेयपयोगी साहित्य २००० कॅमेलिन सुपर रायटिंग किट चे लहान मुलांना वाटप करण्यात आले या प्रसंगी तेजश्री काकडे सरपंच निरा शिवतक्रार, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प सदस्य विराज काकडे, माजी बाधंकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, ग्रा.पं. सदस्य अभिषेक भालेराव, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्षा तनुजा शहा, निरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक कैलास गोतपागर व द रॉयल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुरज कोरडे यांनी केले व सुत्रसंचालन विजय गेजगे सर यांनी केले व ट्रस्टचे सचिव रियाज पठाण यांनी आभार मानले.